लोणी भापकर, येथील श्री दत्त दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी अतिवृष्टी व पूरग्रस्थांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आपला एक महिन्याचा पगार दिला आहे.
दूध उत्पादक करणाऱ्या सभासद शेतकऱ्यांकडून संस्थेच्या वतीने दूध कलेक्शन करणारे अरविंद रामचंद्र बारवकर, आकाश जयराम बारवकर व सनी जाधव या तीन कर्मचाऱ्यांनी व या संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या रेशनिंग वाटप करणारे चारुदत्त विजयराव बारवकर या एका कर्मचाऱ्याने आपला एक महिन्याचा पगार अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या मराठवाडा व विदर्भातील शेतकरी बांधवांसाठी एक मदतीचा हात म्हणून प्रत्येकी महिन्याला मिळणारा 8 हजार रुपये असे 24 हजार व रेशनिंग वाटप करणारे चारुदत्त विजयराव बारवकर यांनी 3 हजार रुपये असे एकूण 27 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार असल्याचे संस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर केले आहे.
हा धनादेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.