बारामती : उपमुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते व कृषीमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थीत मुक्ता - जगन्नाथ पुरस्कार डॉ. संजय सावंत यांना प्रदान करण्यात येणार आहे. दरम्यान मिनी विधानसभा ( झेडपी )निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्याने इच्छुकांच्या यादीत अनेक कार्यकर्ते असल्यामुळे पुरस्कर सोहळ्यात सुद्धा राजकीय धुराळा उधळणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत .
मुर्टी -मोढवे येथे पंडिता रमाबाई समाज प्रबोधन संस्थेच्या विद्यमाने स्वातंत्र्य सैनिक स्व: जगन्नाथ ( आण्णा) कोकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा मुक्ता- जगन्नाथ पुरस्कार डॉक्टर सावंत यांना शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी नऊ वाजता उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते व कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थित प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला बारामती तालुक्यासह पुणे जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट ) सर्व कार्यकर्ते, आजी -माजी पदाधिकारी, विविध संस्था पदाधिकारी, तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय राहणार असल्याने मूर्टी - मोढवे गावात राजकीय धुराळा उडणार असल्याचे बोलले जात आहे.
झेडपी किंवा पंचायत समिती तिकीट आपल्यालाच मिळावे या आशेने अनेक इच्छुक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आपल्या पाठीमागे किती लोक आहेत. हे दादांना कळावे किंवा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रामाणिक कट्टर कार्यकर्ता असून आपण प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहत असतो हे दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न होणार आहे. दरम्यान या पुरस्कर सोहळ्यात दादा व मामा काय बोलणार. का फक्त पुरस्कार वितरण करून निघून जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.