लोणी भापकर, ता. बारामती येथील श्री वाल्मीक शंकर यादव( गुरुजी ) यांचे वयाच्या 78 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत होता.
त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी, पत्नी, एक मुलगा, दोन सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्यामुळे गुरुजींनी आपल्या सेवेची सुरुवात बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावातून केली. त्यानंतर सायंबाचीवाडी, लोणी भापकर, जगदाळे वस्ती व शेवटी शिंदेमळा येथे सेवानिवृत्त झाले. ज्ञानदानाचे कार्य करत असताना लोणी भापकर परिसरात इंग्लिश व गणित विषयाची शिकवणी घेत असताना अनेक गोरगरीब मुलांना व मुलींना त्यांनी मोफत शिक्षण दिले. हे करत असताना त्यांनी एक मुलगा डॉक्टर व एक मुलगा शिक्षक बनवाला. शिक्षक असणाऱ्या त्यांच्या सुनील यादव सरांनी सुद्धा त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ते सुद्धा एकदम अल्प दरात परिसरातील विध्यार्थी व विद्यार्थिनींना गणित आणि इंग्लिश विषयाची शिकवणी ( जादा तास)घेतात.