लोणी भापकर, ता. बारामती येथील निखिल कांबळे या तरुण युवकाने आपल्या वाढदिवसाचा होणारा हजारो रूपये खर्च टाळून मतिमंद मुलांना मदत केली आहे.
सुपे ता. बारामती येथील प्राजक्ता मतिमंद विद्यालयातील विशेष मुलांना आपल्या वाढदिवसा निमित्त मुलांना खाऊ वाटप करून त्यांना जीवनावश्यक वस्तू भेट दिल्या तसेच इलेक्ट्रिक साहित्यही वाटप केले आहे. अनेक तरुण आपल्या वाढदिवसा निमित्त पार्टीसाठी हजारो रुपये खर्च करतात. पण निखिल कांबळे या तरुणाने ज्या मुलांना शी - सू कशी करायची हे पण कळत नाही अशा मुलांच्यात जावून या तरुणाने आपल्या मित्र परिवाराला सोबत घेऊन एक आगळ्या - वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. विशेष मुलांच्यात वाढदिवस साजरा केल्याने वेगळाच आनंद मिळाल्याचे निखिल कांबळे या तरुणाने सांगितले.
या वेळी विशाल जाधव, आबा मदने, प्रथमेश मदने, मनोज मदने, आदित्य भांडवलकर, अभिषेक पवार , मतिमंद विद्यालयातील शिक्षकांसह मनोज भैय्या मित्र परिवार उपस्थीत होते.
........