Talathi karyalay news : मंडल अधिकारी व तलाठी कार्यालयात पाणी, सावलीच्या सुविधांचा अभाव; बलूतेदार संघटनेची ग्रामपंचायतीकडे मागणी !

Vijay Golande
न्यूज स्टेट सेवन प्रतिनिधी : 
लोणी भापकर : मंडल अधिकारी कार्यालय व गाव कामगार तलाठी कार्यालय येथे दररोज शेकडो नागरिक विविध महसुली कामांसाठी येत असतात. मात्र या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तसेच उन्हापासून संरक्षणासाठी सावलीची सुविधा नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर बलूतेदार संघटनेने ग्रामपंचायतीकडे आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
    पळशी, मासाळवाडी, सायंबाचीवाडी, लोणी भापकर, माळवाडी व फोंडवाडा या गावांतील नागरिक विविध दाखले, फेरफार, महसुली नोंदी व इतर कामांसाठी या कार्यालयात येत असतात. उन्हाच्या तीव्र झळांमध्ये नागरिकांना उभे राहावे लागत असल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे ग्रामपंचायतीने कार्यालय परिसरात तात्काळ नळ कनेक्शन देऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तसेच नागरिकांसाठी पत्र्याचे शेड उभारून सावलीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बलूतेदार संघटनेचे अध्यक्ष  दादा कडाळे, माजी उपसरपंच पद्मनाथ कडाळे, सामाजिक कार्यकर्ते धीरज आवाडे, भूमिपुत्र पतसंस्थेचे संचालक सचिन कांबळे यांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे केली आहे.
नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांचा प्रश्न लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
.......
To Top