Solar news : शंभर युनिटपर्यंतच्या ग्राहकांना मोठा दिलासा ; महाराष्ट्रात पी एम स्मार्ट सोलार योजना सुरु ! फक्त दहा हजारांत घरावर सोलार, वीजबिलातून मोठी बचत !

Vijay Golande
न्यूज स्टेट सेवन प्रतिनिधी : 
लोणी भापकर, ता. 26  : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प वीज वापरणाऱ्या कुटुंबांना स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “स्वयंपूर्ण महाराष्ट्र  पी एम SMART रूफटॉप सोलार योजना” सुरू केली आहे. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत घरगुती ग्राहकांना १ किलोवॅट क्षमतेच्या रूफटॉप सोलार प्रणालीसाठी ८० ते ९५ टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश गरीब व EWS कुटुंबांना ऊर्जा स्वावलंबी बनवणे, वीजबिलाचा भार कमी करणे तसेच हरित ऊर्जेला प्रोत्साहन देणे हा आहे. महिन्याला १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणारे निवासी ग्राहक या योजनेस पात्र ठरणार असून BPL, SC, ST आणि EWS कुटुंबांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना 10 हजार रक्कम भरून घरावर सोलार प्रणाली बसवता येणार आहे. अतिरिक्त निर्मित वीज ग्रीडला विकून उत्पन्न मिळण्याची सुविधाही उपलब्ध राहणार आहे. तसेच पाच वर्षे मोफत देखभाल व दुरुस्ती सुविधा दिली जाणार असल्याने ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
ही योजना महावितरण (MSEDCL) मार्फत राबविण्यात येणार असून MNRE मानकांनुसार “Made in India” सोलार मॉड्यूल वापरणे बंधनकारक असणार आहे. लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडे वैध सिंगल फेज वीज कनेक्शन असणे, वीजबिलाची थकबाकी नसणे तसेच राष्ट्रीय सोलार पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे.
 या योजनेसाठी आधार कार्ड, अलीकडील वीजबिल, उत्पन्न किंवा जात प्रमाणपत्र, बँक खाते तपशील आणि घरमालकीचा पुरावा आवश्यक असणार आहे. राज्य शासनाच्या या योजनेअंतर्गत घरगुती ग्राहकांना १ किलोवॅट क्षमतेच्या रूफटॉप सोलार प्रणालीमुळे 100  युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार असुन त्यापुढील वापर होणाऱ्या युनिटचे फक्त बील येणार असल्याने जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा फायदा घ्यावा असे लोणी भापकरचे शाखा अभियंता  सागर शेलार यांनी सांगितले.
................
To Top