School news : लोणीभापकरच्या न्यू इंग्लिश स्कूलची यशाची घोडदौड !दहावीच्या परीक्षेत 92.04 टक्के निकाल; शुभम ठोंबरेने 96.20 टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. तर राज्यात गणित विषयात द्वितीय येत नैतिक रांगोळेची चमकदार कामगिरी !

Vijay Golande
लोणीभापकर, ता. बारामती : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटवत न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, लोणीभापकर प्रशालेने एस.एस.सी. (दहावी) फेब्रुवारी/मार्च 2026 परीक्षेत तब्बल 92.04 टक्के निकालाची दमदार नोंद केली आहे. विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमासह शिक्षकांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे.
यंदाच्या परीक्षेत ठोंबरे शुभम नामदेव याने 96.20 टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. भापकर अथर्व विनोद (93.80 टक्के) द्वितीय, कु. जगदाळे सायली हनुमंत (93.00 टक्के) तृतीय, नवगण प्रथमेश संतोष (91.60 टक्के) चतुर्थ तर कु. पाटोळे आदिती विजय (90.60 टक्के) हिने पाचवा क्रमांक मिळवत प्रशालेच्या गुणवत्तेची परंपरा जपली.
दरम्यान, भारती विद्यापीठ, पुणे आयोजित संबोध परीक्षा 2025-26 मध्ये रांगोळे नैतिक तुकाराम याने गणित विषयात 100 पैकी 99 गुण मिळवत राज्यात द्वितीय क्रमांक संपादन केला. नैतिकच्या या दैदिप्यमान यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब भापकर , सचिव बी. एस. भापकर सर, सहसचिव विजयसिंह भापकर, खजिनदार टी. पी. भापकर सर, प्राचार्य संदीप जगताप सर, संचालक मंडळ, आजी-माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या जोरावर शहरांनाही मागे टाकत यशाचा झेंडा फडकावल्याने लोणीभापकर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
To Top