सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील काळखैरेवाडी नजीक खैरेपडळ येथील मोकळ्या जागेत अज्ञात महिलेच्या डोक्यात शस्त्राचा घाव घालून अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना सोमवारी (दि. 19) रोजी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान उघड झाली आहे. या घटनेने सुपे परिसरात एकच खळबळ उडाली असुन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता 25 ते 27 या वयोगटातील महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने मारून खून केल्याचे निदर्शनास आले आहे.
बारामती येथील शासकीय रुग्णालयात या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास आणि आरोपीचा शोध घेण्याकरिता न्यायवैद्य शास्त्रीय टीम आणि शॉन पथक अशी पाच पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. सुपे पोलीस स्टेशनमध्ये 103/1 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. ते म्हणाले की आमच्या पथकाकडून आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेच पाहुन आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. अधिक तपास सुप्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे करीत आहेत.

