Breking news : आमिष दाखवून पळवून नेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पोलिसांकडून सुखरूप शोध ! वडगाव निंबाळकर पोलिसांचे पालकांकडून आभार !

Vijay Golande
      न्यूज स्टेट 7 प्रतिनिधी : 
मुर्टी, ता. बारामती येथून एका अनोळखी व्यक्तीने आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलांना पळवून नेल्याची तक्रार वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. घटनेची गंभीर दखल घेत वडगांव निंबाळकर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.
मोबाईल लोकेशन व गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी भीमाशंकर, ता. खेड येथे शोधमोहीम राबवून संबंधित दोन्ही मुलांना सुखरूपपणे ताब्यात घेतले. त्यानंतर मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
 याबाबतची सविस्तर वृत्त असे की, शुभम गणेश जाधव वय 16 वर्ष  व पियुष विलास मोहिते वय 15 वर्षे दोन्ही राहणार मुर्टी तालुका बारामती जिल्हा पुणे यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी अमिष दाखवून फुस लावून पळवून नेले होते. त्याबाबत मुलाचे पालक गणेश दामू जाधव राहणार मुर्टी यांनी दिनांक 25/11/25 रोजी फिर्याद दिलेली होती ती वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे दाखल होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करीत असताना तपासी अधिकारी ग्रेड पोलीस उपनिरीक्षक वारुळे साहेब यांनी सदर मुलाकडे असणारे मोबाईल नंबरचे आधारे तांत्रिक माहितीचा व गोपनीय बातमीदारांचा आधार घेऊन सदर बेपत्ता मुले ही भीमाशंकर तालुका खेड जिल्हा पुणे येथे मोबाईल फोनचे लोकेशन मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन मुलांचा शोध घेतला असता सदर मुले भीमाशंकर येथे मिळून आली सदर मुलांना ताब्यात घेऊन त्यांचे पालक श्री गणेश दामू जाधव व विलास कुंडलिक मोहिते यांना करंजेपूल पोलीस दूरक्षेत्र येथे बोलावून घेऊन मुलांना त्यांचे पालकांच्या ताब्यात दिले. 
        सदरची कामगिरी ही  श्री संदीपसिंह गिल्ल सो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण., श्री गणेश बिरादार सो अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग,  श्री सुदर्शन राठोड सो उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग. यांचे मार्गदर्शनाखाली श्री नागनाथ पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे, पोलीस हवलदार रमेश नागटिळक, पोलीस हवालदार अमोल भोसले यांचे पथकाने केली आहे
मुलं सुरक्षितपणे परत मिळाल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास टाकत वडगांव निंबाळकर पोलिसांचे आभार मानले. पोलिसांच्या तत्परता व कार्यक्षमतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
...............

To Top