Sad news ! मंगल बारवकर यांचे दुःखद निधन !

Vijay Golande
लोणी भापकर ता. बारामती येथील स्थानिक शैक्षणिक क्षेत्रात आदर्श म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश उर्फ राजेंद्र विठ्ठल बारवकर यांच्या पत्नी मंगल सुरेश बारवकर यांचे गुरुवार दिनांक 06 /11/2025 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. वय केवळ 52 वर्षे होते. त्यांच्या अचानक निधनाने गावात व शिक्षकी वर्तुळात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्या काळाच्या पडद्याआड गेल्या. सौम्य, मनमिळाऊ, धार्मिक व कुटुंबवत्सल स्वभावामुळे त्यांचा गावामध्ये आदर होता.
 अचानक धक्का बसणाऱ्या घटनेची माहिती मिळताच परिसरातील शिक्षक, ग्रामस्थ व नातेवाईकांनी कुटुंबीयांना भेट देऊन सांत्वन व्यक्त केले. ज्ञानदाणाचे पवित्र कार्य करणाऱ्या  शिक्षक पत्नीच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  त्यांच्या पश्चात पती शिक्षक सुरेश बारवकर, मुलगा डेअरी उद्योजक अक्षय बारवकर व  मुलगी अक्षदा, कुटुंबीय असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते रमेश बारवकर व शिक्षक सोसायटीचे चेअरमन संजय बारवकर हे त्यांचे दीर होत.
दशक्रिया विधी उद्या शनिवार दिनांक 15/11/2025 रोजी सकाळी 8.00 वाजता दत्त घाट दत्त मंदिर  लोणी भापकर (ता. बारामती) येथे होणार आहे. यनिमित्ताने ह भ प  आकाश महाराज कामथे यांची प्रवचन सेवा  होणार आहे.
......... 

To Top