विजय गोलांडे : न्यूज स्टेट 7
बारामती : जिल्हा परिषदचे आरक्षण जाहीर झाल्याने अनेक मात्तबरांचे मिनी विधानसभेत जाण्याचे स्वप्न भंगले आहे. वडगांव निंबाळकर गटात सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने महिला उमेदवार कोण? का पक्षाकडून निष्ठावतांचा होणार गेम!
मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद गटांचे (मतदारसंघ) आरक्षण काल जाहीर झाले असून पुणे जिल्ह्यात 73 तर बारामती तालुक्यातील 6 गटांत आरक्षण सोडतीत अनेकांचे स्वप्न भंगले आहे, तर अनुकूल आरक्षण पडलेल्या अनेकांना आतापासून जिल्हा परिषद सदस्य झाल्याची स्वप्ने पडू लागली आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी २०२६ पर्यंत घेण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार आज जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितींच्या गणांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यात अनेक बड्या नेत्यांचे जिल्हा परिषदेत जाण्याचे स्वप्न भंगले आहे. राजकीय पंढरी समजल्या जाणाऱ्या बारामती तालुक्यात अनेक नेत्यांनी गेल्या 6 महिन्यापासून मतदार संघातील एकही कार्यक्रम चुकवाला नाही. यामध्ये विवाह सोहळा, पूजा, गणपती आरती, गणपती विसर्जन, वाढदिवस, बारशे, दहीहंडी उत्सव यात्रा -जत्रा, जागरण- गोंधळ, मयत, सावडणे, दशक्रिया विधी या सारख्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा सपाटाच लावला होता. आपल्यालाच उमेदवारी मिळणार या अपेक्षेने काहींनी तर लाखात वर्गण्या देवून मंडळाना खुश केले होते. पण आरक्षण सोडतीत भ्रम निराश झाल्याने त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. राजकीय पंढरीत एकाच घरात दोन पक्ष असल्याने समोरासमोर लढणार का? एकमेकाला छुपा पाठिंबा देणार असे तर्क- वितर्क लढवले जात असून वडगांव- निंबाळकर गटात कोणत्या गावातून महिला उमेदवाराला संधी मिळणार याची राजकारणी प्रेमीनां सध्या तरी वाट पाहावी लागणार आहे.
.....


