Divali Faral : वृद्धाश्रमात दिशा अकॅडमीतर्फे दिवाळीचा पहिला दिवा

Vijay Golande






  Divali Faral :वृद्धाश्रमात दिशा अकॅडमीतर्फे दिवाळीचा पहिला दिवा

बारामती, दि. 15 : बारामती तालुक्यातील तांदुळवाडी येथे असलेल्या बारामती ज्येष्ठ नागरिक निवास वृद्धाश्रमात यावर्षी प्रथमच दिशा अकॅडमी बारामती तर्फे दिवाळी साजरी करण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन दिशा अकॅडमीचे संस्थापक नितीन कदम सर आणि रुपाली कदम मॅडम यांच्या पुढाकारातून करण्यात आले.
          भारतीय संस्कृतीशी नाळ जोडत  ज्येष्ठांचा सन्मान आणि त्यांच्यासोबत आनंद वाटणे  हा हेतू डोळ्यासमोर ठेवून या वर्षीची दिवाळी वृद्धाश्रमात साजरी करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. दिवाळीचा पहिला दिवा यावर्षी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या सहवासात प्रज्वलित करण्यात आला. सर्व ज्येष्ठ नागरिकांचे औक्षण करण्यात आले.
या प्रसंगी दिशा अकॅडमीतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी मनमोकळे संवाद साधले, त्यांच्या आठवणी ऐकल्या आणि गप्पागोष्टी व सुमधुर गाण्यांच्या माध्यमातून आनंदाचा माहोल निर्माण केला.
       ज्येष्ठांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद देत, “यशस्वी व्हा, समाजासाठी कार्य करा आणि आई-वडिलांचा सन्मान राखा,” अशा शुभेच्छा दिल्या. संस्थेचे व्यवस्थापक श्री गणेश शेळके सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना नातेसंबंध जोपासण्याबाबत मार्गदर्शन केले. 
      दरम्यान विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रम परिसराची पाहणी केली, प्रांगणात दिवाळीचा पहिला दिवा प्रज्वलित केला तसेच आकाशकंदील व रोषणाईने संपूर्ण वातावरण आनंदमय केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव होत आत्मिक समाधानाचा अनुभव मिळाला.
या उपक्रमासाठी परवानगी व सहकार्य दिल्याबद्दल वृद्धाश्रम चे अध्यक्ष व सर्व विश्वस्तांचे दिशा अकॅडमीचे संस्थापक नितीन कदम व रुपाली कदम  यांनी आभार मानले.
To Top